
अभिनेत्री सारा अली खान हिने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहे. सारा तिच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत कायम आठ 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं केदारनाथ (Kedarnath) येथे जात असते.

आता देखील सारा केदारनाथ याठिकाणी जाऊन आली. अभिनेत्रीने काही फोटो देखील पोस्ट केले आहे. तिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहे.

फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये सारा म्हणाली, जगातील एकमेव ठिकाण जे पूर्णपणे परिचित वाटतं आणि तरीही मला प्रत्येक वेळी आश्चर्यचकित करतं. माझ्याकडे जे काही आहे ते मला दिल्याबद्दल आणि मी जे काही आहे ते बनवल्याबद्दल धन्यवाद... असं म्हणत साराने देवाचे आभार मानले.

सांगायचं झालं तर, सारा अली खान हिने 'केदारनाथ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमात सारा हिच्यासोबत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुख्य भूमिका साकारली.

सारा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.