तुळजापुरात भाविकांच्या श्रद्धेशी खेळ? दिव्यात टाकलेल्या तेलाची पुन्हा विक्री?

तुळजापूरमधील तुळजा भवानी मंदिरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. भाविकांनी दिव्यात टाकलेलं तेल पुन्हा बाटलीमध्ये भरून त्याची विक्री होत असल्याचा दावा या व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे.

| Updated on: Aug 14, 2026 | 2:04 PM
1 / 5
सध्या तुळजापूरमधल्या तुळजा भवानी मातेच्या मंदिराचा एक व्हिडीओ व्हायर होत आहे. या व्हिडीओमध्ये असा दावा करण्यात आला आहे, की भाविक मंदिरातील दिव्यात जे तेल टाकतात त्याची पुन्हा विक्री करण्यात येत आहे.

2 / 5
या व्हिडीओमध्ये करण्यात आलेल्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. भविकांच्या श्रद्धेशी खेळ सुरू आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

3 / 5
विक्रीसाठी जे तेल ठेवण्यात आलं आहे, ते भाविकांनी मंदिरातील दिव्यात टाकलं होतं. परंतु तेच तेल काढून पुन्हा बाटलीमध्ये भरलं गेलं आणि ते पुन्हा विक्रीसाठी ठेवण्यात आलं, असा दावा या व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे.

4 / 5
दरम्यान याबाबत संबंधित विक्रेत्याकडे विचारणा केली असता, चौकशी करायची असेल तर मंदिराच्या ऑफीसमध्ये जा किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे जा असं उत्तर विक्रेत्याकडून देण्यात आलं आहे.

5 / 5
मात्र हा व्हिडीओ जरी व्हायरल होत असला तरी हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे? तसेच या व्हिडीओमध्ये जो दावा करण्यात आला आहे, तो खरा आहे का? याची अद्याप स्वतंत्रपणे पुष्टी करण्यात आलेली नाहीये.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us