
जर तुमच्या खात्यात पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला नाही तर घाबरून जावू नका. काही गोष्टींची पूर्तता न केल्याने हा हप्ता आज तुम्हाला मिळाला नसेल. ईकेवायसीसह एग्रीस्टॅकसारखी नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच स्पेलिंगमध्ये चूक झाली असेल तर हा हप्ता थांबवण्यात आला नसेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पीएम किसान योजनेतंर्गत 22 वा हप्ता थोड्याच वेळात कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतील. योजनेची रक्कम जवळपास 20,000 कोटी रुपये आहे. ही रक्कम 9.3 कोटी शेतकर्यांच्या खात्यात जमा होईल. योजनेतंर्गत शेतकर्यांच्या खात्यात दरवर्षी 6000 रुपये जमा करण्यात येतात.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 22 वा हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत असेल, त्यांना दोन हजारांचा हप्ता मिळेल. तुम्हाला या योजनेचा फायदा होईल की नाही हे घर बसल्या तपासता येईल.

pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा. शेतकरी कॉर्नर हा पर्याया निवडा. त्यानंतर लाभार्थ्यांच्या यादीवर जा. याठिकाणी तुमचा आधार क्रमांक, खाते क्रमांक टाका. आता "Get Data" वर क्लिक करा. लागलीच पेमेंट स्टेट्सवर क्लिक करून चेक करा.

ई-केवायसी पूर्ण झाली असेल तर लाभार्थ्याला रक्कम मिळण्यास अडचण येत नाही. खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. तर एग्रीस्टॅक या पोर्टलवर जाऊन नोंदणी करणे ही सरकारने अत्यावश्यक केले आहे. तरच खात्यात पैसा येईल.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेविषयी काही अडचण असल्यास शेतकर्यांनी हेल्पलाईन क्रमांक 1800-115-5525 वर संपर्क करावा. तिथे त्यांच्या प्रश्नांचे निरसन होण्यास मदत होईल.