
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट झाली. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत.

COP 28 अर्थातच संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद यंदा दुबईत होत आहेत. या परिषदेसाठी पंतप्रधान दुबईत आहेत. यावेळी नरेंद्र मोदी यांची आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट झाली.

समृद्ध आणि शाश्वत भविष्यासाठी भारत आणि इटलीच्या संयुक्त प्रयत्नांवर माझा विश्वास आहे, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी या भेटीचा फोटो शेअर केलाय.

जॉर्जिया मेलोनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा सेल्फी शेअर केलाय. COP 28 परिषदेत दोन चांगले मित्र भेटले, #Melodi म्हणत मेलोनी यांनी हा फोटो शेअर केलाय.

या दोघांच्या फोटोची सोशल मीडियावर तुफान चर्चा होतेय. एका नेटकऱ्याने या तर राजमाता म्हणत हा फोटो शेअर केलाय.