
रियो डी जेनेरोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहचले. त्यानंतर अनिवासी भारतीयांनी त्यांचे भव्य स्वागत केले. ऑपरेशन सिंदूरचे विशेष सादरीकरण करण्यात आले. ऑपरेशन सिंदूरवर 'सौगंध मेरी मिट्टी की देश नही झुकने दुंगा' हे गाणे वाजवण्यात आले. त्यावर अनिवासी भारतीय नाचत होते. हा सांस्कृतिक कार्यक्रम पाहिल्यानंतर पंतप्रधान मोदी हसताना दिसले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटातील हे गाणे होते. हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले होते. अभिनेता विवेक ओबेरॉय याने चित्रपटात पंतप्रधानांची भूमिका केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय वंशाच्या एका लहान मुलीचे कौतूक करताना दिसले. पंतप्रधान मोदी यांना पाहण्यासाठी रिओ दि जानेरो शहरात लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता. मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती.

भारतीय वंशाच्या लोकांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून त्यांना खूप आनंद झाला. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची संधी मिळाली नाही. परंतु रिओ दि जानेरोमध्ये हे शक्य झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्समध्ये सामील होण्याव्यतिरिक्त ब्राझीलचे अध्यक्ष सिल्वा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या बैठकीत व्यापार, ऊर्जा, संरक्षण, अंतराळ तंत्रज्ञान, आरोग्य आणि शेती यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.