पीएम सूर्य घर योजनेचा लाखोंचा टप्पा पार, 20 लाख कुटुंबांचे वीज बिल झाले शून्य, तुम्हीही करू शकता अर्ज, जाणून घ्या प्रोसेस

पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा आणि किती अनुदान मिळते, जाणून घ्या.

| Updated on: Oct 09, 2026 | 8:47 PM
1 / 7
केंद्र सरकारच्या पीएम सूर्य घर मोफत  वीज योजनेने आता देशातील 60 लाख कुटुंबाचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत 20 लाख कुटुंबाचं वीजबील शून्य करण्यात या योजनेला यश आले आहे. या योजनेअंतर्गत सोलर पॅनेल बसवण्यासाठी सरकारकडून अनुदानही दिल जातं आहे.

केंद्र सरकारच्या पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेने आता देशातील 60 लाख कुटुंबाचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत 20 लाख कुटुंबाचं वीजबील शून्य करण्यात या योजनेला यश आले आहे. या योजनेअंतर्गत सोलर पॅनेल बसवण्यासाठी सरकारकडून अनुदानही दिल जातं आहे.

2 / 7

पीएम सूर्य घर योजना : मोफत वीज योजना 13 फ्रेबुवारी 2024 रोजी सुरू करण्यात आली. या योजनेसाठी केंद्र सरकारने 75,021 कोटी रुपयांची तरतूद केली आह. देशातील 1 कोटी घरांवर छतावर सौरउर्जा यंत्रणा बसवण्याचं या योजनेचं उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 50.99 लाखांहून अधिक घरांवर सोलर यंत्रणा लावण्यात आल्या आहेत. यामुळे 17,855 मेगावॅट सौरउर्जा क्षमता जोडली गेली आहे.

3 / 7

पीएम सूर्य घर योजनेसाठी अर्ज कसा करावा?: 1. सर्वप्रथम पीएम सूर्य घर योजना या अधिकृत वेबसाईटला भेट द्या 2. नोंदणी करताना आपलं राज्य आणि वीज वितरण कंपनी जोडा. 3. वीज ग्राहक क्रमांक, मोबाईल नंबर आणि ई - मेल यांसारखी आवश्यक माहिती भरा.

4 / 7

4. नोंदणी झाल्यानंतर पोर्टलवर लॉगिन करून छतावरील सोलर यंत्रणेसाठी अर्ज करा. 5. आवश्यक मंजूरी मिळाल्यानंतर योजनेत नोंदणीकृत विक्रेत्याकडून सोलर पॅनेल बसवून घ्या.

5 / 7

6.यंत्रणा बसवल्यानंतर नेट मीटरसंबंधी प्रक्रिया पूर्ण करा आणि पोर्टलवर आवश्यक माहिती भरा. 7. तपासणी आणि प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनुदानासाठी आवश्यक बँक तपशील द्या

6 / 7

किती अनुदान मिळतं : सोलर यंत्रणेच्या क्षमतेनुसार अनुदान दिलं जातं. 2 किलोवॅटसाठी प्रति किलोवॅट 30,000 रूपये, 1 किलोवॅटसाठी 18,000 रूपये, 3 किलोवॅट किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी 78,000 पर्यंत अनुदान मिळतं

7 / 7

मात्र प्रत्यक्ष खर्च, पात्रता आणि मिळणारं अनुदान हे यंत्रणेची क्षमता, लागू नियम आणि संबंधित वीज वितरण कंपनीच्या प्रक्रियेवर अवलंबून असतं. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत पोर्टलवर दिलेली माहिती तपासणं महत्त्वाचं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us