
जळगावातील उच्चभ्रू परिसरात प्रोफेसर कॉलनीतील एका घरात सुरू वेश्या व्यवसायावर चालू असल्याचे समजताच पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे.

या घरामध्ये एक बांगलादेशी तरुणी मिळून आली असून तिची पोलिसांनी सुटका केली आहे. संबंधित तरुणीला शासकीय आशादिप वस्तीगृहात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी घराची मालकीण असलेल्या एका महिलाविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल तपास करत आहेत.

बांगलादेशी तरुणीला डांबून ठेवून कुंटणखाना चालवला जात होता. तशी तक्रार पुण्यातील एका सामाजिक संस्थेने केली होती. दाखल तक्रारीनंतर पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली.

संबंधित घर मालकीणीवर याआधीही अशाच स्वरूपाचे दोन गुन्हे दाखल असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. कारवाईत सापडलेल्या बांगलादेशी तरुणीकडे बांगलादेशातील ओळखपत्रदेखील आढळून आले. ती भारतात कशी आली आणि ती या जाळ्यात कशी सापडली याचा पोलीस तपास करणार आहेत.