
राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 जागांसाठीवरील नियुक्ती मागच्या बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होती. आता आज अखेर या जागांवर नियुक्ती करण्यात आली आहे. आज विधानभवनात 7 विधानपरिषदेच्या आमदारांचा शपथविधी पार पडला.

राज्य मंत्रिमंडळाने काल 7 जागांसाठी नावांचा प्रस्ताव पाठवला. आज या सात जणांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. यात भाजपच्या धडाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांचाही समावेश आहे. काहीच वेळाआधी चित्रा वाघ यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीची शपथ घेतली आहे.

चित्रा वाघ या कायम महिलांच्या प्रश्नांसाठी लढा देताना दिसतात. 'महिलांचा आवाज' म्हणून चित्रा वाघ परिचित आहेत. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये चित्रा वाघ यांनी कायमच पीडितेची बाजू लावून धरली आहे.

चित्रा वाघ

चित्र वाघ यांच्या आक्रमक शैलीने आणि धडाडीने विरोधकांना कायम घाम फोडला आहे. महिला प्रश्नांसाठी त्यांनी अनेकदा रस्त्यावर उतरत आंदोलनं केली आहेत. आता चित्रा वाघ य विधान परिषदेच्या सदस्य झाल्या आहेत.