
महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेची युती होईल की नाही माहित नाही, पण विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी नगरपरिषदेत भाजप आणि शिवसेना एकत्र आलीय.

शिवसेना खासदार कृपाल तुमाने आणि भाजप आमदार समिर मेघे यांच्या प्रयत्नाने बुटीबोरी नगरपरिषदेत दोन्ही जुने मित्र एकत्र आलेय.

सभापती निवडीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे.

सेना भाजप एकत्र आल्याने बुटीबोरी नगरपरिषदेत भाजपचे 5 तर शिवसेनेचा 1 सभापती बिनविरोध निवडून आलाय.

सध्या बुटीबोरीत भाजपचे बबलू गौतम नगराध्यक्ष आहे.

बुटीबोरीतील युतीचा हा फॅार्म्यूला राज्यात राबवण्याची इच्छा नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी व्यक्त केली.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे बुटीबेरी ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतलेली नगरपरिषद आहे. त्यामुळे बुटीबोरी नगरपरिषदेत सेना-भाजप एकत्र येण्याची सध्या जोरात चर्चा सुरु आहे.