मंजुनाथाचं दर्शन घेऊन मनाला विलक्षण समाधान मिळालं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

CM Eknath Shinde at Manjunath Mandir : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटक दौऱ्यावर, मंजुनाथाचं दर्शन घेतलं; म्हणाले...

| Edited By: | Updated on: May 08, 2023 | 2:05 PM
1 / 5
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. कर्नाटकात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हा दौरा करत आहेत.

2 / 5
सागरी कर्नाटक भागाचे आराध्य दैवत असलेल्या भगवान मंजुनाथाचे दर्शन घेऊन मनाला विलक्षण समाधान मिळालं, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

3 / 5
निसर्गाने समृद्ध असलेल्या या परिसरात अतिशय पवित्र आणि प्रसन्न वातावरणातील या मंदिराला भेट देऊन वेगळेच अध्यात्मिक शांतता अनुभवण्यास मिळल्याची भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

4 / 5
या भेटीदरम्यान धर्मस्थळाचे धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे यांचीही एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा केली.

5 / 5
यावेळी खासदार राहुल शेवाळे, भाजपचे स्थानिक उमेदवार हरीश पुंजा आणि स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.