Photo Gallery: कपाटांमध्ये कचऱ्यासारख्या नोटा, रात्र सरली तरी नोटा मोजणे सुरूच; घबाड पाहून अधिकारीही चक्रावले

| Updated on: Dec 24, 2021 | 1:03 PM

उत्तर प्रदेशातील कानपूरमधील व्यापारी पीयूष जैन यांच्या घरी आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापे मारले आहेत. या छापेमारीवेळी आयकर विभागाला कपाटं भरून भरून नोटा सापडल्या आहेत. कुबेराचं हे घबाड पाहून स्वत: आयकर विभागाचे अधिकारी चक्रावून गेले आहेत.

1 / 5

2 / 5
पीयूष जैन हे कानपूरच्या कन्नौज येथे राहतात. गुरुवारी त्यांच्या कार्यालय आणि घरी छापे मारण्यात आले. यावेळी त्यांच्या घरातील कपाटांमध्ये नोटा खच्चून भरलेले असंख्य बॉक्स सापडले. या नोटा एवढ्या मोठ्या प्रमाणात होत्या की आयकर विभाला या नोटा मोजण्यासाठी चार मशीन मागवाव्या लागल्या.

3 / 5
raid at Piyush Jain home

raid at Piyush Jain home

4 / 5
 जैन हे पान मसाला समूहाचे संस्थापक आहेत. त्यांचा परफ्यूमचाही व्यवसाय आहे.  त्यांच्या सात ठिकाणांवर छापेमारी करणअयात आली आहे. या छापेमारीत 150 कोटी रुपयांची अघोषित संपत्तीचा खुलासा झाला आहे. तसेच आयकर विभागाने 90 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.

5 / 5
आयकर विभागाने जैन यांच्या कन्नौज येथील घर, कार्यालय, पेट्रोल पंप आणि कोल्ड स्टोरेजवर एकसाथ छापेमारी केली. त्याशिवाय मुंबईतील शोरुम आणि कार्यालयावरही छापेमारी केली आहे. त्याशिवाय डीजीजीआयच्या गुजरात आणि मुंबईच्या पथकांनी सकाळी 10 वाजता छापेमारी सुरू केली आहे.