
काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या लडाख दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

शालेय विद्यार्थ्यांशीही राहुल गांधी यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी गाण्याचा आनंद घेतला.

राहुल गांधी यांनी बाईक सफरीचा आनंद घेताना तिथल्या स्थानिकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

उत्तरेकडील डोंगर रांगा पाहिल्या की त्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह कुणालाही आवरत नाही. राहुल गांधी यांनीही या डोंगररांगांना आपल्या मोबाईलमध्ये टिपलं आहे.

लडाखच्या रस्त्यांवरून फेरफटका मारत असताना राहुल गांधी यांनी स्थानिक बाजारातून फळंही खरेदी केली.