
राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर काही आठवड्यांपूर्वी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले.

महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचे नवीन सरकार स्थापन झाले. तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.

एकीकडे महाराष्ट्रातील राजकारणात मंत्रिमंडळाच्या हालचाली वेगात सुरु असताना दुसरीकडे एक महत्त्वाची घडामोड घडली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांची ही पहिलीच भेट होती.

या भेटीवेळी देवेंद्र फडणवीसांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन नरेंद्र मोदींचे स्वागत केले. त्यासोबतच त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्तीही भेट म्हणून देण्यात आली.

या भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र फडणवीस आणि मोदी भेटीदरम्यान महाराष्ट्रातील राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचे बोललं जात आहे.

दरम्यान देवेंद्र फडणवीस हे कालपासून दिल्लीत आहेत. काल रात्री अमित शाह, जे.पी. नड्डा यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल चर्चा झाली.