
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच दिवस जपान दौऱ्यावर आहेत. 21 ते 25 ऑगस्ट फडणवीस जपानमध्ये असणार आहेत.

जपान दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. त्याचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत.

जपानमध्ये असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केलं.

देवेंद्र फडणवीस यांनी पारंपरिक जपानी जेवणाचाही आनंद घेतला. या प्रेमामुळे मी भारावून गेलोय, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी टोकियो ते क्योटो शिंकान्सेन बुलेट ट्रेनने प्रवास केला. यावेळी वेग, अचूकता आणि शिस्त अनुभवली!, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.