
सकाळपासून सुरू असलेल्या गदारोळानंतर अखेर आता मनसेच्या मोर्चाला मीरा-भाईंदरमध्ये सुरुवात झालेली आहे.

मराठी-अमराठीच्या वादातून हा मोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चात सामान्य नागरिकांचा देखील मोठ्या संख्येने सहभाग बघायला मिळत आहे.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठ्याप्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.

मोर्चाला परवानगी नसल्याने सकाळपासून मोर्चासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांकडून सुरू होती. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

आता मनसे नेते संदीप देशपांडे, अभिजीत पानसे, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत हे मोर्चाच्या ठिकाणी दाखल होत आहेत. याठिकाणी लवकर पोहोचता यावं यासाठी त्यांनी लोकल ट्रेनचा आधार घेतला आहे.