
मीरा-भाईंदरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेने (मनसे) च्या मराठी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. परिसरात मनसे कार्यकर्ते दिसताच पोलिसांनी तात्काळ कारवाईचा अवलंब केला असून, ते ॲक्शन मोडवर आले आहेत.

पोलिसांनी मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून कुठल्याही कार्यकर्त्याला रस्त्यावर थांबू दिले जात नाही आहे.

मनसैनिक आक्रमक पवित्रा घेत आता रस्त्यावर उतरले आहेत. तर कार्यकर्ते दिसताच पोलीस सगळ्यांना बसमध्ये कोंबत असल्याचं दिसत आहे.

मनसेच्या अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे.

मनसेचा हा मोर्चा मीरा भाईंदरच्या बालाजी हॉटेलपासून सुरु होणार होता. या भागात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर धरपकड सुरू आहे. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे.

मीरा भाईंदरमध्ये आम्ही सर्व ठिकाणी पुरेसा बंदोबस्त नेमला आहे. महत्त्वाचे चौक, रेल्वे स्थानकं आणि जंक्शनच्या परिसरात बंदोबस्त नेमण्यात आला आहे.