
उद्धव ठाकरे

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. मागच्या काही दिवसांपासून याबाबत चर्चा सुरु होती मात्र आता हा पक्षप्रवेश निश्चित झालं आहे. लवकरच त्यांचा ठाकरे गटात प्रवेश होणार आहे.

उद्या दुपारी चार वाजता चंद्रहार पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. मातोश्रीवर हा पक्षप्रवेश होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातून ते महाविकास आघाडीचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे.

चंद्रहार पाटील यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत या पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे. तर सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांनी लोकसभेची उमेदवारी मिळू शकते.

चंद्रहार पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मागच्या काही दिवसांपासून चंद्रहार पाटील हे या निवडणुकीची तयारी करत आहेत. विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ते उपस्थित राहत आहेत. त्यामुळे उद्या ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांची पुढची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं असेल.