आजी-माजी राज्यपालांमध्ये भेट; रमेश बैस आणि भगतसिंह कोश्यारी यांच्यात नेमकी काय चर्चा?

| Updated on: May 16, 2023 | 3:37 PM

Bhagat Singh Koshyari Meets Mahatashtra Governor Ramesh Bais : रमेश बैस आणि भगतसिंह कोश्यारी यांच्यात राजभवनावर भेट; काय कारण? पाहा...

1 / 5
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. काहीवेळा आधीच ते मुंबईत दाखल झाले आहेत.

2 / 5
भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. राजभवनावर जात त्यांनी बैस यांची भेट घेतली.

3 / 5
रमेश बैस यांनी भगतसिंग कोश्यारी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती भेट दिली. ही सदिच्छा भेट असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

4 / 5
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल देताना सर्वोच्च न्यायलयाने भगतसिंग कोश्यारी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांचे निर्णय चुकीचे असल्याचं न्यायालयाने म्हटलं. या घडामोडींनंतर कोश्यारी पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर आहेत.

5 / 5
भगतसिंग कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची कारकीर्द वादात राहिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत तसंच सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर टीका झाली.