
गणपतीचा आज तिसरा दिवस आहे. त्यामुळे सगळीकडे जल्लोष पाहायला मिळतोय. घरोघरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे. अनेक नेते मंडळींच्या घरीही बाप्पा विराजमान झाला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरीही गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मनोभावे बाप्पाची आरती केली. बाप्पाच्या दर्शनासाठी अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या घरी हजेरी लावली.

शालेय शिक्षण मंत्री मंत्री दीपक केसरकर यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जात गणपतीचं दर्शन घेतलं. दीपक केसरकर यांच्या हस्ते गणरायाची पूजा करण्यात आली.

भाजपचे वरिष्ठ नेते प्रवीण दरेकर यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जात बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, कृष्णा खोपडे, राम शिंदे, राजेंद्र राऊत, बबनराव शिंदे हेदेखील उपस्थित होते.

आमदार रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं. आमदार राणा यांच्यासोबतचा फोटो फडणवीसांनी सोशल मीडियावर शेअर केलाय.