
अजित पवार यांनी भाजपसोबत हात मिळवणी केली. 2 जुलैला राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची त्यांनी शपथ घेतली.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अजित पवार यांची भेट घेतली.

अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी रामदास आठवले यांनी ही सदिच्छा भेट घेतली.

अजित पवार यांना हार घालत आणि पुष्प गुच्छ देत रामदास आठवले यांनी अभिनंदन केलं.

अजित पवार यांनी या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही सदिच्छा भेट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे