
सध्या राज्या अनेक ठिकाणी चांगला पाऊस होतोय. मात्र काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली. नागरिकांचे हाल झाले.

परवाच्या दिवशी नागपूरमध्ये अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे अनेकांच्या घरात-दुकानात पाणी शिरलं. यामुळे नागपूरमधील स्थानिक नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरातील या पूरस्थितीचा आढावा घेतला. नागपूरमधील विविध भागात जात त्यांनी पाहणी केली.

डागा लेआऊट आणि कॉर्पोरेशन कॉलनी इथं जात देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिकांशी संवाद साधला. त्यांच्या नुकसानीची माहिती घेतली. तसंच सरकार तुमच्या पाठिशी आहे, असा विश्वासही त्यांनी दिला.

नागपूरमधील आंबेझरी तवालालाही देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. तिथे जात त्यांनी नुकसानीची पाहणी केली. तसंच लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, अशा सूचना दिल्या.