
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मागच्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यानंतर अजित पवार पुन्हा अॅक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय.

नाराजीच्या चर्चांनंतर अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशकात ठिकठिकाणी त्यांचं जंगी स्वागत केलं जातंय.

मंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी पुष्पगुच्छ देत ओझर विमानतळावर स्वागत केलं.

राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांचं जंगी स्वागत केलं जातंय. भला मोठा हार घालत अजित पवार यांचं स्वागत केलं.

दिंडोरीमध्ये अजित पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. 10 दहा जेसीबींनी फुलांची उधळण करत त्यांचं स्वागत करण्यात आलं. तर आज नाशिकमध्ये शेतकरी मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलं आहे.