
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा पाचवा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं जात आहे.

अटल स्मृतीस्थळावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींना अभिवादन केलं.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही स्मृतिस्थळावर जात अभिवादन केलं.

थोड्याच वेळात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ही स्मृतिस्थळाचे दर्शन घेणार आहेत.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या कविता, त्यांचं भाषण म्हणजे पर्वणी असायची. त्यांच्या स्मृतीदिनी आज वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यांच्याबद्दलच्या आठवणी आज जागवल्या जात आहेत.