
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची बीडमध्ये जाहीर सभा होतेय.बीडमधील या सभास्थळी जात असताना शरद पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

शरद पवार यांना भव्य हार घालण्यात आला. तर जेसीबीच्या सहाय्याने फुलांचीही उधळण करण्यात आली.

महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार-शरद पवार, देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो, अशा घोषणांनी यावेळी परिसर दुमदुमला होता.

शरद पवार ज्या मार्गाने सभास्थळाकडे जात होते. त्या मार्गावर ठिकठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी उभे होते.

माजी आमदार बदामराव पंडित यांच्या गेवराई घरीही शरद पवार यांनी भेट दिली. राष्ट्रवादीच्या सभेला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात शरद पवार या सभेला संबोधित करतील.