Raj Thackeray : राज ठाकरेंच्या विरोधात उत्तर प्रदेशमध्ये पोस्टरबाजी, बृजभूषण सिंह यांच्या सभा स्थळी लावलेल्या बॅनरची चर्चा

| Updated on: May 20, 2022 | 1:18 PM

राज ठाकरेंना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सुध्दा भेट घ्यायची आहे. धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवल्याबद्दल राज ठाकरेंनी योगींचे कौतुक केले होते.

1 / 5
उत्तर प्रदेशचे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या ५ जूनच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करताना, त्यांनी आधी उत्तर भारतीय लोकांची माफी मागावी, असा इशारा दिला आहे. राज ठाकरे यांनी अनेकवेळा उत्तर भारतीयांचा अपमान केला आहे. अशा परिस्थितीत त्यांना उत्तर प्रदेशात येऊ देऊ नये असंही ते म्हणाले आहेत.

2 / 5
राज ठाकरेंना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सुध्दा भेट घ्यायची आहे. धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवल्याबद्दल राज ठाकरेंनी योगींचे कौतुक केले होते. ठाकरेंच्या अयोध्या रॅलीची मनसेने ट्रेन आणि हॉटेल्स बुक करून तयारी सुरू केली आहे.

3 / 5
राज ठाकरेंनी मंदिराच्या भेट देण्याआधी अनेक नेत्यांनी त्यांना उत्तर भारतीयांची माफी मागण्यास सांगितले आहे. राज ठाकरे यांनी अयोध्येत येण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी, असे अयोध्येचे सर्वोच्च संत महंत कमल नयन दास म्हणाले. इतरांच्या भावना दुखावण्याचा अधिकार कोणालाही नाही, असेही ते म्हणाले आहेत.

4 / 5
अयोध्या दौऱ्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रात पोस्टर वॉर सुरू झाले आहे. मुंबईतील लालबाग परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोस्टर लावले आहे. ‘राज ठाकरेंना कोणी दुखावण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटेल’, असे या पोस्टरवर लिहिले आहे.

5 / 5
केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुढील महिन्यात उत्तर प्रदेशातील अयोध्येला जाण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी, असे सांगितले आहे.