
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील भाजपचे तालुकाध्यक्ष मधुकर बिरामणे यांच्या दोन चार चाकी गाड्यांची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आल्याची घटना घडलीय. या प्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोडफोड का करण्यात आली याचं कारण समोर आलं नाही.

साताऱ्यातील महाबळेश्वर येथील भाजपचे तालुकाध्यक्ष मधुकर बिरामणे यांच्या 2 चार चाकी गाड्यांची आज अज्ञात व्यक्तींनी काचा फोडून तसेच तोडफोड करून नुकसान केले आहे. तर शेतीसाठी जोडलेली पाईप लाईन ही जाळून टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

मधुकर बिरामणे हे पाचगणी जवळच्या राजपुरी या गावात वास्तव्यास आहेत. गावातीलच शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत आणि विकास कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आवाज उठवल्यामुळे हा जाणीवपूर्वक प्रकार केला असल्याचा आरोप बिरामणे यांनी केला आहे.

मधुकर बिरामणे यांनी याप्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात वाहनांचे नुकसान केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भाजप तालुकाध्यक्षांच्या गाडीची तोडफोड करण्यात आल्यानं महाबळेश्वरमध्ये खळबळ उडाली आहे. मधुकर बिरामणे यांनी यांच्या शेतातील पाईपलाईन देखील जाळण्याचा प्रयत्न झालाय.

मधुकर बिरामणे यांच्या दोन चार चाकी पैकी एका चार चाकी वाहनाच्या सर्व काचा फोडण्यात आल्या आहेत. तर, जुन्या चारचाकीच्या समोरच्या भागातील काच देखील फोडण्यात आली आहे.