AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांच्या विमान अपघाताचा अहवाल कधी येणार? केंद्र सरकारने सांगितली तारीख

Ajit Pawar Plane Crash Report : अजित पवार यांच्या विमान अपघातावर अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. अशातच आता लवकरच या अपघाताचा अहवाल समोर येणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

अजित पवारांच्या विमान अपघाताचा अहवाल कधी येणार? केंद्र सरकारने सांगितली तारीख
Ajit Pawar Plane Crash ReportImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Feb 22, 2026 | 3:19 PM
Share

अजित पवार यांचे 28 जानेवारीला बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात निधन झाले आहे. या अपघातात अजित दादांसह दोन पायलट, एक सुरक्षा रक्षक आणि एका फ्लाईट एअर होस्टेसचाही मृत्यू झाला होता. या अपघातामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. या अपघाताबाबत अनेकांनी शंका उपस्थित केली होती. अनेकांनी घातापाताचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे आता संपूर्ण देशाचे लक्ष या अपघाताबाबतच्या अहवालाकडे लागले आहे. या अहवालातून अजित पवार यांच्या विमानाचा अपघात कसा झाला याचे कारण समोर येणार आहे. आता केंद्र सरकारने या अपघाताचा अहवाल कधी समोर याची माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

विमान अपघातावर अनेकांना शंका

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या अपघातावर शंका उपस्थित करत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच त्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर आता केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भाष्य केले आहे. ‘कोण काय म्हणत यात जायचं नाही. आमच्या खात्यातील तपास यंत्रणा वेळोवेळी तपासाबद्दल माहित देत आहे.’

विमान अपघाताचा अहवाल कधी येणार?

पुढे बोलताना अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशी अहवालावरही मुरलीधर मोहोळ यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ‘अजित पवार पवार यांच्या विमान अपघाताचा 28 फेब्रुवारी आधीच प्राथमिक अहवाल येणार आहे. अजित पवार यांच्या विषयी दोन दिवसांपूर्वी सिविल एव्हियेशियने स्पष्ट स्वरुपात प्रसिद्धीपत्रक जारी केले असून त्यात माहिती दिली आहे.’ त्यामुळे आता या अहवालातून नेमकी काय माहिती समोर येते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

28 जानेवारीला अपघात

दरम्यान, 28 जानेवारीला सकाळी अजित पवार मुंबईवरून बारामतीच्या दिशेने जात होते. विमान बारामती विमानतळाजवळ पोहोचले होते. मात्र पहिल्या प्रयत्नात ते धावपट्टीवर उतरू शकले नाही. त्यामुळे पायलटने दुसरा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नादरम्यान हे विमान धावपट्टीपासून अवघ्या काही अंतरावर कोसळले. यात अजित पवार यांच्यासह एकूण 5 जणांचा मृत्यू झाला होता. आता अहवाल समोर आल्यानंतर या अपघाताचे खरे कारण समोर येणार आहे.

Follow Us
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
Uddhav Thackeray | आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत
ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
मोठी घोषणा! ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
Raj Thackeray | हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार!
Priyanka Gandhi | पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार! सरकारला दिलं थेट आव्हान
प्रधानांचा राजीनामा नाही पण चर्चेची तयारी? केंद्र सरकारची भूमिका काय?
Dharmendra Pradhan News |  धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत केंद्र सराकर नेमकी काय भूमिका घेणार?
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय!
Uddhav Thackeray | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय! म्हणाले...
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट म्हणाले....
मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
PM Modi Tweet | मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट