AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बॅस्टियन’मधून शिल्पा शेट्टीची कोट्यवधींची कमाई, पण एकही रुपया नेत नाही घरी; पतीने सांगितलं सिक्रेट

शिल्पा शेट्टीने 2019 मध्ये बॅस्टियन हॉस्पिटॅलिटीसोबत भागीदारी केली होती. तेव्हापासून या ब्रँडचा वेगाने विस्तार झाला आहे. मुंबईनंतर बंगळुरू, पुणे यांसारख्या शहरांमध्ये बॅस्टियने आऊटलेट्स सुरू झाले. बॅस्टियन आता एक लक्झरी ब्रँड बनला आहे.

| Updated on: Jul 23, 2026 | 1:23 PM
Share
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आजवर विविध चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. अभिनयाव्यतिरिक्त ती इतर व्यवसायातूनही कोट्यवधींची कमाई करत आहे. शिल्पाचा 'बॅस्टियन' नावाचा रेस्टॉरंट अनेकांच्या परिचयाचा आहे. तिचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राने व्यवसायाबद्दल खुलासा केला आहे.

1 / 5
राज कुंद्राने खुलासा केला की, शिल्पा आणि तो 'बॅस्टियन'च्या कमाईचा एकही पैसा घरी नेत नाहीत. ते पगार किंवा कमावलेला नफासुद्धा घेत नाहीत. रेस्टॉरंटमधून मिळणारा सर्व नफा बिझनेसच्या विस्तारासाठी पुन्हा गुंतवला जातो. यामुळेच एका आऊटलेटने सुरू झालेला हा ब्रँड आता देशभरात जवळपास नऊ रेस्टॉरंटपर्यंत वाढला आहे.

2 / 5
राज कुंद्राने यावेळी असाही खुलासा केला की, बिझनेसमध्ये त्यांच्यासाठी वास्तूला विशेष महत्त्व आहे. बॅस्टियनचं कोणतंही नवीन आऊटलेट सुरू करण्यापूर्वी वास्तू तज्ज्ञ आणि पंडित संपूर्ण जागेची सखोल पाहणी करतात. सर्वकाही अनुकूल आढळल्यानंतरच नवीन रेस्टॉरंट सुरू केलं जातं, असं त्याने सांगितलं.

3 / 5
ज्योतिषी आणि वास्तू तज्ज्ञ जया मदन यांनी दावा केला की, बॅस्टियनचं पहिलं आऊटलेट सुरू झाल्यानंतर त्यांनी भविष्यवाणी केली होती की, बॅस्टियन एकेदिवशी मोठा ब्रँड बनेल. त्यांनी अशीही भविष्यवाणी केली होती की, शिल्पा आणि राज यातून खूप पैसे कमावतील, पण तो पैसा ते नवीन आऊटलेट्समध्ये गुंतवतील. ही भविष्यवाणी बऱ्याच अंशी खरी ठरल्याची कबुली राजने दिली.

4 / 5
गेल्या वर्षी लेखिका शोभा डे यांनी असा दावा केला होता की, मुंबईतील बॅस्टियन रेस्टॉरंटची एका रात्रीत दोन ते तीन कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र शिल्पा शेट्टीने नंतर हे दावे फेटाळून लावले होते. "तसं असतं तर किती बरं झालं असतं. मला आशा आहे की एकेदिवशी असं घडेल. पण सध्या तरी हे आकडे अचूक नाहीत", अशी प्रतिक्रिया शिल्पाने दिली होती.

5 / 5
Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब

बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा