
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांना मुंबईतील अनुशक्तीनगरमधून अजित पवार गटाने उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाने स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांना उमेदवारी दिली आहे.

फहाद अहमद यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी 2022 मध्ये समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून फहाद अहमद राजकारणात सक्रिय आहेत.

फहाद अहमद यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शुल्क माफीबद्दल त्यांनी आंदोलन होतं. याशिवाय फहद अहमद यांनी सीएए कायद्याच्या विरोधातील रॅलींमध्ये सक्रीय सहभाग घेतला होता.

फहाद अहमद हे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे पती आहेत. 16 फेब्रुवारी 2023 मध्ये स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनी लग्न केलं.

लग्नानंतर 23 सप्टेंबर 2023 ला स्वरा भास्करने मुलीला जन्म दिला होता. स्वरा देखील राजकीय मुद्द्यांवर स्वतःचं मत मांडत असते.