
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी कांजूर पोलीस ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचे उपविभाग प्रमुख अनंत पाताडे यांच्या विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

16 मार्च रोजी अनंत पताडे यांनी 17 वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पीडित मुलीने काही दिवसांनी आपल्या आई-वडिलांना ही गोष्ट सांगितली.

त्यानंतर या मुलीच्या आई-वडिलांनी काल कांजूर पोलीस ठाण्यात येऊन अनंत पाताडे यांच्याविरोधात तक्रार दिली.

चौकशीत कांजुर पोलिसांनी अनंत पाताडे याच्या विरोधात पॉक्सको कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिली..

पाताडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विक्रोळी विधानसभेतील अनंत पाताडे यांना उपविभागप्रमुख पदावरून पदमुक्त करण्यात आले आहे.