
वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल हे वेदांता ग्रुपचे एकमेव वारसदार होते.त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा कोट्यवधी रुपयांचा बिजनस कोण चालवणार असा सवाल केला जात आहे.

वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांच्या मुलगा अग्निवेश याची पत्नीचे नाव पूजा बांगूर अग्रवाल असे असून ती श्री सिमेंटचे व्यवस्थापकीय संचालक हरि मोहन बांगूर याची मुलगी आहे. तर श्री सिमेंटचे संस्थापक आणि चेअरमन बेनु गोपाल बांगूर यांची नात आहे.

या प्रकारे पूजा बांगूर अग्रवाल यांचे माहेर देखील औद्योगिक घराण्याशी संबंधित गणले जाते. पूजा बांगूर प्रसिद्धीच्या झोतापासून कायमच दूर राहणे पसंत करतात. त्यांच्या मुलांसंदर्भात पुरेशी माहिती पब्लिक डोमेनमध्ये नाही.

पूजा आणि अग्निवेश अग्रवाल यांचा विवाह गोवाच्या फोर्ट अगुआडा रिसॉर्टच्या शेजारी समुद्रकिनारी झाला होता. त्यांच्या विवाह समारंभाला अनेक बडी नामीगिरामी आसामी मुंबई आणि कोलकाताहून 600 हून अधिक पाहूणे जेट एअरवेजच्या चार्टर्ड विमानांनी पोहचले होते.

दिवंगत अग्निवेश अनिल अग्रवाल यांची बहिण प्रिया अग्रवाल हेब्बर जी वेदांता लिमिटेडच्या Non-executive director आणि हिंदुस्थान झिंक लिमिटेडचे प्रेसिडन्ट आहेत. तसेच त्या अनिल अग्रवाल फाऊंडेशनची संचालक देखील आहेत. अनिल अग्रवाल यांनी अजून आपला उद्योग वारसा कोण चालवणार आहे हे सांगतलेले नाही.