Pooja Birari On Trolling: बांदेकरांचं घरचं प्रोडक्शन, तिला सहज काम मिळेल; टोमणे ऐकल्यानंतर पुजा बिरारीने सांगितले सत्य
Pooja Birari On Trolling: आदेश बांदेकर यांची सून पूजा बिरारीने नुकतेच ‘बांदेकरांचं घरचं प्रोडक्शन हाऊस आहे, तुला काय लगेच काम मिळेल’ या टोमण्यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मराठी अभिनेत्री पूजा बिरारीने काही महिन्यांपूर्वी 'होम मिनिस्टर फेम' आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर याच्याशी लग्न केले. बांदेकरांची सून असलेली पूजा बिरारी सध्या एका कारणामुळे सर्वत्र चर्चेत आहे.
नुक्त्यात दिलेल्या एक मुलाखतीत पूजा बिरारीने लग्नानंतरच्या प्रवासाचे काही अनुभव सांगितले आहेत.
बांदेकरांची सून झाल्यानंतर पूजाला अनेकदा ‘बांदेकरांचं घरचं प्रोडक्शन हाऊस आहे, तुला काय लगेच काम मिळेल’ असे टोमणे सेटवर सहन करावे लागले.
याबाबत बोलताना पूजा म्हणाली की, कलाकारांना असे वाटू शकते, पण प्रोडक्शनच्या बाजूने हे ठरवणारे कोणीच नसते आणि चॅनलचेही म्हणणे असते. ती भूमिका कशी असते. तिथे कास्ट करताना आम्ही कोणीच नसतो.
हा एक समज असतो की घरचं प्रोडक्शन आहे तर तिला लगेच कास्ट करतील. पण आमच्यात हे स्पष्ट आहे की मी प्रोफेशनली ऑडिशन देईन आणि कधीही फेवर केलं जाणार नाही असे पुजा म्हणाली.
पुढे ती म्हणाली, योग्य असू तर तिथे असू, नाहीतर कुठेच नसू. बळजबरीचं काम होऊ शकत नाही आणि आरशात बघितलं की ही उत्तरं स्वतःलाच द्यावी लागतात.