
पूजाने 'महाराष्ट्राज् बेस्ट डान्सर'या डान्स शोमध्ये जजची भूमिका साकारली आहे.

‘बळी’ या आपल्या आगामी चित्रपटात ती वेगळी भूमिका साकारते आहे. ‘बळी’या चित्रपटाबद्दल त्यातील अनेक नाविन्यपूर्ण गोष्टींसाठी प्रेक्षकांमध्ये उत्कंठा लागून राहिली असताना पूजाची त्यातील डॉक्टरची भूमिका हे या आतुरतेचे आणखी एक कारण आहे.

आपल्या नाटयमय आणि नाविन्यपूर्ण चित्रपटांसाठी ओळखली जाणारी पूजा सावंत ही एक प्रतिभावान अभिनेत्री म्हणूनही ओळखली जाते. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती पहिल्यांदाच स्वप्निल जोशीबरोबर रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

‘बळी’ हा पूजाचा विशाल फुरियाबरोबरचा दुसरा चित्रपट आहे. तिने ‘लपाछापी’ या त्याच्या गाजलेल्या व प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी नावाजलेल्या चित्रपटात काम केले होते.

या पोस्टरमध्ये तिच्या हातात स्टेथोस्कोप आहे आणि त्यावरून या चित्रपटात ती डॉक्टरच्या भूमिकेत आहे, हे ध्यानात येते. अत्यंत आश्वासक अशा तिच्या या लूकवरून प्रेक्षकांनाही या चित्रपटात आपल्याला दमदार अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार त्याही खात्री पटते.