Shweta Tiwari Photos : लाल साडीमध्ये खुललं श्वेता तिवारीचं मनमोहक सौंदर्य, दिवाळीनिमित्त खास लूक, चाहत्यांना दिल्या शुभेच्छा

बॉलिवूड, टीव्ही आणि वेबसिरीज गाजवणारी अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. नव्या फोटोंमध्ये श्वेता प्रचंड सुंदर दिसत आहे. तिने चाहत्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

| Updated on: Nov 08, 2026 | 5:12 PM
1 / 7
 बॉलिवूड अभिनेत्री श्वेता तिवारी हिने काही नवे फोटो शेअर केले आहेत. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी तिने इन्स्टाग्रामवर हे फोटो पोस्ट केलेत.

बॉलिवूड अभिनेत्री श्वेता तिवारी हिने काही नवे फोटो शेअर केले आहेत. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी तिने इन्स्टाग्रामवर हे फोटो पोस्ट केलेत.

2 / 7

या फोटोंमध्ये श्वेता प्रचंड सुंदर दिसत असून तिने लाल रंगाची डिझायनर साडी परिधान केली आहे. त्यावर तितकाच भारी आणि सुंदर ब्लाऊज पेअर केला आहे.

3 / 7

तिचा मिनिमल मेकअप आणि ज्वेलरीची निवड ही खूप परफेक्ट झाली आहे. दिवाळीचा सर्वत्र उत्साह दिसत असून श्वेतानेही तिच्या सेलिब्रेशनला चाहत्यांबरोबर शेअर केलं आहे. श्वेता तिवारीचे लाखो चाहते आहेत. ज्यांना तिने विश केलं आहे.

4 / 7

Happy beautiful Diwali to all of you असं फोटो कॅप्शन देत त्यासोबत दिव्याचे इमोजीही तिने जोडले आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनीही तिला रिप्लाय देत शुभेच्छा दिल्यात.

5 / 7

श्वेता तिवारी ही आता तब्बल ४६ वर्षांची आहे पण तिचा फिटनेस हा सर्वात भारी आहे. तिने स्वतःला एवढं मेंटेन करुन ठेवलं आहे की कोणीही तिचा वयाचा आकडा कळल्यावर आश्चर्यचकीत होतो.

6 / 7

श्वेताने टीव्हीच्या छोट्या पडद्यावरुन करिअरची सुरुवात केली होती. आता तिने सिनेमे वेब सिरीजमध्येही स्वतःला सिद्ध केलं आहे. अनेक जाहिरातींमध्येही ती झळकली आहे. तिचा एक मोठा चाहतावर्ग आहे.

7 / 7

सर्व फोटो साभार- श्वेता तिवारी इन्स्टाग्राम

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us