
या आठवड्यात टीआरपीच्या बाबतीत टॉपवर असलेला शो आहे अनुपमा. रुपाली गांगुलीच्या या शो ला प्रेक्षकांच भरपूर प्रेम मिळतय. रिपोर्ट्सनुसार या आठवड्यात टीआरपीमध्ये या शो ला रेटिंग मिळालय 2.3

ये रिश्ता क्या कहलाता हा पॉपुलर टीवी शो दुसऱ्या नंबरवर आहे. भारताच्या इतिहासातील हा जुन्या शो पैकी एक आहे. टीआरपीमध्ये या शो चा दबदबा आहे. या शो चा टीआरपी आहे 2.0

दोन देशकानंतर टीव्ही विश्वात आलेला स्मृती इराणीचा पॉपुलर शो क्योंकि सास भी कभी बहू थी तिसऱ्या नंबरवर आहे. या शो ची रेटिंग्स आहे 1.9. म्हणजे या शो ला प्रेक्षकांचा बऱ्यापैकी प्रतिसाद मिळतोय.

चौथ्या नंबरवर आहे दोन दशकापासून सुरु असलेला शो तारक मेहता का उल्टा चश्मा. क्योंकि सास भी कभी बहू थी आणि तारक मेहताची टीआरपी सेम आहे 1.9. तारक मेहतामध्ये अनेक बदल झालेत, तरी हा शो आपली जादू टिकवून आहे.

तुम से तुम तक का हा शो टीआरपी चार्टमध्ये पाचव्या नंबरवर आहे. व्यूअरशिपमध्ये हा शो तारक मेहता का उल्टा चश्मापेक्षा मागे नाहीय. रिपोर्ट्सनुसार या शो ला 1.8 टीआरपी मिळाला आहे.