सुकन्या समृद्धी योजना ते ज्येष्ठ नागारिक बचत योजनेचा नियम बदलला, खातेधाराकांना काय फायदा होणार? जाणून घ्या सविस्तर
PPF, सुकन्या समृद्धी आणि SCSSसह अनेक बचत योजनांमध्ये व्याजाची दुरुस्ती आता अधिक काटेकोर पद्धतीने केली जाणार. एका अधिकाऱ्याने केलेली नोंद दुसऱ्या अधिकाऱ्याकडून तपासली जाणार असल्याने अनधिकृत बदलांना आळा बसण्याची शक्यता आहे.

Image Credit source: tv9 marathi
- पोस्ट ऑफिसमध्ये PPF, सुकन्या समृद्धी आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना अशा अनेक बचत योजनांमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. खात्यावर जमा झालेल्या व्याजात काही चूक झाली किंवा व्याजाची दुरूस्ती करायची असेल तर त्यासाठीची प्रक्रिया आता अधिक कडक करण्यात आली आहे. पोस्ट ऑफिसने व्याजातील बदलांसाठी ‘मेकर – चेकर’ पद्धत लागू केली आहे. म्हणजेच आता अधिकाऱ्याने केलेली नोंद दुसऱ्या अधिकाऱ्याकडूनही तपासली जाणार आहे.
- पोस्ट ऑफिसने व्याजाच्या दुरूस्तीशी संबंधित प्रक्रियेत अतिरिक्त पडताळणाीचा टप्पा जोडला आहे. आता मेकर -चेकर पद्धतीने व्याजाच्या नोंदणीची तपासणी दोन वेळा केली जाणार आहे. यामुळे चुकीच्या किंवा अनधिकृत व्याज दुरूस्तीला आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
- कोणत्या योजनांवर परिणाम होणार : ही प्रक्रिया पोस्ट ऑफिससोबत PPF, सुकन्या समृद्धी योजना, NSS-87, NSS-92,मासिक उत्पन्न योजना MIS आणि ज्येष्ठ नागारिक बचत योजना म्हणजे SCSS यांसारख्या खात्यांमधील व्याज समायोजनासाठी लागू आहे. म्हणजेच या योजनांमध्ये व्याजाची नोंद दुरूस्त करण्याची गरज पडल्यास नवीन प्रक्रियेचा वापर केला जाईल.
- मेकर – चेकर पद्धत कशी असेल : नव्या प्रक्रियेत पहिल्या टप्प्यात संबंधित हेड ऑफिसमधील SBCO सुपरवाईझर व्याज समायोजनांची नोंद करेल. त्यानंतर त्याच नोंदीची तपासणी संबंधित सर्कलमधील CPC सुपरवाईझर करेल. त्यामुळे व्याजातील बदल एका व्यक्तीच्या नोंदीवरच अवलंबून राहणार नाही.
- व्याजाची दुरूस्ती मनमानी पद्धतीने करता येणार नाही : व्याजामध्ये बदल करण्यापूर्वी संबंधित खात्याची माहिती व्याजाची रक्कम, लागू तारीख आणि योजनेची माहिती तपासावी लागेल. त्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांनी लेखी मंजूरी किंवा आदेश आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही खात्यात फक्त तोंडी सूचना किंवा अनधिकृत पद्धतीने व्याजाची रक्कम बदलता येणार नाही.
- खातेधारकांसाठी याचा काय फायदा होणार : या बदलामुळे व्याजाची नोंद करताना झालेल्या चुका शोधण्याची आणि दुरूस्ती करण्याची प्रक्रिया अधिक नियंत्रित होईल. एका अधिकाऱ्याने केलेल्या नोंदीची दुसऱ्या अधिकाऱ्याकडून पडताळणी होत असल्याने चुकीचे किंवा अनधिकृत व्याज समयोजन रोखण्यास मदत होणार आहे.
- त्यामुळे खातेधारकांनी काय लक्षात ठेवावे? PPF किंवा सुकन्या समृद्धी खात्यात व्याजाची रक्कम चुकीची दिसत असल्यास संबंधित पोस्ट ऑफिसशी संपर्क साधता येईल. मात्र नवीन प्रक्रियेनुसार व्याजातील दुरूस्ती ही मंजूरी, नोंद आणि पडताळणीच्या ठराविक प्रक्रियेतूनच केला जाणार आहे.
- व्याजदरात बदल झालेला नाही : या नव्या नियमाचा अर्थ PPF किंवा सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर बदलला असा नाही. ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 या तिमाहीसाठी सरकारने लघू बचत योजनांचे व्याजदर कायम ठेवले आहेत.
Follow Us








