Post Office Rule Change : लक्ष द्या! पोस्ट ऑफिस योजनांच्या नियमांत महत्त्वाचे बदल, PPF ते सुकन्या, अनेक योजनांवर मोठा परिणाम!

पोस्ट ऑफिसच्या विविध बचत योजनांच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. PPF, सुकन्या समृद्धी योजना आणि इतर योजनांशी संबंधित नियम जाणून घेणे गुंतवणूकदारांसाठी आवश्यक आहे. नवीन नियमांचा खाते व्यवस्थापन, गुंतवणूक आणि लाभांवर काय परिणाम होणार, याची सविस्तर माहिती जाणून घ्या आणि तुमच्या बचतीचे योग्य नियोजन करा.

| Updated on: Oct 06, 2026 | 10:34 PM
1 / 5
पोस्ट ऑफिसने बचत खाते, पीपीएफ, सुकन्या समृद्धी, एनएसएस, मासिक आय योजना आणि वरिष्ठ नागरिक बचत योजनांमधील व्याज रकमेतील बदलांसाठी मेकर-चेकर प्रणाली लागू केली आहे.

पोस्ट ऑफिसने बचत खाते, पीपीएफ, सुकन्या समृद्धी, एनएसएस, मासिक आय योजना आणि वरिष्ठ नागरिक बचत योजनांमधील व्याज रकमेतील बदलांसाठी मेकर-चेकर प्रणाली लागू केली आहे.

2 / 5

सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर आता एक अधिकारी व्याज समायोजनाची नोंद करेल, तर दुसरा अधिकारी तिची तपासणी व पडताळणी करेल.

3 / 5

पूर्वी नोंद आपोआप सत्यापित होत होती. नव्या प्रक्रियेमुळे त्रुटींची शक्यता कमी होऊन पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढणार आहे.

4 / 5

आता एचआयएआरएम मेनूमधून केवळ व्याज रक्कम (मुद्दल नाही) बदलायची असेल. तर कमाल 5 लाख रुपयांपर्यंतचे समायोजन होऊ शकते; त्यापेक्षा जास्त असल्यास चेन्नई येथील सीपीआरसीकडे पाठवावे लागेल.

5 / 5

या नव्या नियमांमुळे व्याज समायोजन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि छाननी सुनिश्चित होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us