
आर्थिक वर्ष सुरु झालं की गुंतवणुकीचं तजवीज सुरु होते. गुंतवणूक नेमकी कुठे केली तर कर बचत होईल यासाठी विचार केला. तुमच्या पब्लिक प्रॉव्हिडेंड फंडमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं ठरू शकते. चला जाणून घेऊयात पाच फायदे

सरकारने आर्थिक वर्ष 2023-24 च्या एप्रिल ते जून या तिमाहीसाठी पीपीएफ व्याज दर 7.1 टक्के ठेवला आहे. हा तिमाहीचा 12 वा टप्पा असून यात व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही.

पीपीएफवर अन्य छोट्या गुंतवणुकीच्या तुलनेत भले कमी व्याज दर असेल. पण कर बचतीसाठी सर्वात उत्तम गुंतवणूक ठरू शकते. पीपीएफ ईईई कॅटेगरीतील गुंतवणूक आहे. यात दरवर्षी 1.5 लाख रुपये गुंतवणूक केल्यास कर सवलत मिळते. मॅच्योरिटीवर मिळणारी रक्कमही टॅक्स फ्री असते.

दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून पीपीएफ चांगला पर्याय आहे. प्रत्येक वर्षी 1.5 लाख रुपये जमा करून पीपीएफमधून 40 लाखांचा फंड जमा करू शकता.

पीपीएफ एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून गणलं जातं. कारण यामध्ये केलेल्या गुंतवणुकीतून 100 टक्के रिटर्न मिळतं. त्यामुळे यात गुंतवणूक केल्याने जोखिम कमी असते.

पीपीएफमध्ये गुंतणुकीचा एक फायदा म्हणजे तुम्ही एकूण जमा असलेल्या रकमेच्या 25 टक्के कर्ज घेऊ शकता. इतकंच नाही तर तुम्ही तीन वर्षाच्या आत कर्जाची परतफेड केल्यास तुम्हाला फक्त 1 टक्के वार्षिक व्याज भरावा लागतो.