
प्रभास याचा आदिपुरुष हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. आदिपुरुष हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. आदिपुरुष या चित्रपटात प्रभास हा मुख्य भूमिकेत आहे.

प्रभास याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. आदिपुरुष चित्रपटाचे कोणी काैतुक करत आहे तर काही जण चित्रपटावर टिका करत आहेत.

नुकताच एक धक्कादायक घटना घडलीये. हैद्राबाद येथे थिएटरच्या बाहेर एक व्यक्ती नकारात्मक रिव्ह्यू देत होता. हे ऐकून प्रभासच्या चाहत्यांचा पारा चढला आणि त्या व्यक्तीला थेट मारहाण करण्यास सुरूवात करण्यात आली.

काही लोकांनी थिएटर बाहेरच आदिपुरुष चित्रपटाला नकारात्मक कमेंट करणाऱ्यांची धुलाई केली. आता याचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

या फोटोवर कमेंट करत एकाने लिहिले की, खरे बोलले तर हे सहन झाले नाही का? आदिपुरुष चित्रपटाच्या विरोधात अनेक लोक ह सतत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसत आहेत.