आपण सुसंस्कारी विचारांच्या महाराष्ट्रात आहोत यावर विश्वास बसत नाही; प्राजक्ता माळीची पोस्ट व्हायरल

प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या पोस्टमध्ये तिने आपण सुसंस्कारी विचारांच्या महाराष्ट्रात आहोत यावर विश्वास बसत नाही असे म्हटले आहे.

| Updated on: Oct 13, 2025 | 11:57 AM
1 / 6
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही कायमच चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. सध्या प्राजक्ता एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

2 / 6
प्राजक्ताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने आपण सुसंस्कारी विचारांच्या महाराष्ट्रात आहोत यावर विश्वास बसत नाही असे म्हटले आहे.

3 / 6
प्राजक्ता म्हणाली की, मनाचे श्लोक... चित्रपटाचं प्रमोशन त्यानिमित्ताने चित्रपटाचं नाव किमान महिनाभर आधी माहित असताना, सेन्सॉर बोर्डने सर्टिफिकीट दिल्यानंतर, सुप्रिम कोर्टाने क्लिन चीट दिली असतानादेखील चित्रपट गृहात घुसून चित्रपट बंद पाडला गेला...

4 / 6
पुढे प्राजक्ता पोस्टमध्ये म्हणाली की, आपण लोकशाही असलेल्या भारतात, अतिशय सुसंस्कारी विचारांच्या महाराष्ट्रात आहोत यावर विश्वास बसत नाही.. तीव्र निषेध!

5 / 6
सध्या सोशल मीडियावर प्राजक्ता माळीची ही पोस्ट चर्चेत आहे. तिने मृण्मयी देशपांडेच्या मनाचे श्लोक या चित्रपटाला पाठिंबा दिल्याचे पोस्ट वरुन स्पष्ट होत आहे.

6 / 6
मनाचे श्लोक हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच त्याला विरोध होत आहे. या चित्रपटाचे नाव समर्थ रामदास स्वामी महाराजांनी रचलेल्या ‘मनाचे श्लोक’ या पवित्र ग्रंथाच्या नावाचा वापर चित्रपटासाठी केल्यामुळे वादंग निर्माण झाला आहे. हिंदू जनजागृती समितीने या चित्रपटाला तीव्र विरोध दर्शवला असून, हा हिंदूंच्या श्रद्धेचा “बाजार मांडण्यासारखा प्रकार” असल्याचा आरोप करण्यात आला आहे.