‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये प्राजक्ता माळीने पहिल्यांदाच धरला अहिराणी गाण्यावर ठेका

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमातील आगामी भागात अभिनेत्री प्राजक्ता माळी पहिल्यांदाच अहिराणी गाण्यावर ठेका धरणार आहे. हा भाग प्रेक्षकांसाठी खास मेजवानी ठरणार आहे. यावेळी अहिराणी गाण्याची टीम उपस्थित राहणार आहे.

| Updated on: Apr 28, 2026 | 8:49 AM
1 / 5
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. या कार्यक्रमात अभिनेत्री प्राजक्ता माळीचा नेहमीच एक वेगळा अंदाज पहायला मिळतो. आता आगामी एपिसोडमध्ये चाहत्यांसाठी खास सरप्राइज आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. या कार्यक्रमात अभिनेत्री प्राजक्ता माळीचा नेहमीच एक वेगळा अंदाज पहायला मिळतो. आता आगामी एपिसोडमध्ये चाहत्यांसाठी खास सरप्राइज आहे.

2 / 5

सोनी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांचा लाडका विनोदी कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा आगामी एपिसोड आणखी रंगतदार होणार आहे. कारण आजच्या भागात पहिल्यांदाच लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी अहिराणी गाण्यावर नृत्य सादर करताना दिसणार आहे.

3 / 5

तिच्या या खास परफॉर्मन्सची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या खास भागात नव्या आहिराणी गाण्याची टीमही उपस्थित राहणार आहे. यात कलाकार उत्कर्ष शिंदे, विनोद कुमावत, शीतल अहिरराव, तसेच गायक आणि संगीतकार समीर केएस, गीतकार भैय्या मोरे आणि निर्माते गोकुळ पाटील यांचा समावेश आहे.

4 / 5

या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणारा हा भाग प्रेक्षकांसाठी खास मेजवानी ठरणार आहे. प्राजक्ता माळीचा अहिराणी ठेक्यावरचा दमदार डान्स आणि हास्यजत्रेच्या कलाकारांची भन्नाट कॉमेडी यामुळे आजचा भाग अत्यंत मनोरंजक असेल, यात काही शंका नाही.

5 / 5

अहिराणी भाषा खानदेशात म्हणजेच जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये बोलली जाते. खानदेश म्हणजे अहिर देश, अहिरांचा देश आणि अहिरांची बोली ती अहिर वाणी किंवा अहिराणी.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us