
राजस्थान, केरळ, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशनंतर आता महाराष्ट्रातही ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ‘बर्ड फ्लू’पासून बचाव करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

जर, तुम्ही चिकन, अंडी खाणार असाल, तर किमान 70 डिग्री सेल्सिअस तापमानावर अर्धा तास चिकन, अंडी शिजवा आणि मगच खा.

शक्य असल्यास कोंबडीचे मांस 100 डिग्री सेल्सिअस शिजवल्यानंतरच खा.

कच्चे मांस किंवा अंडे खाण्याची चूक करू नका. यामुळे संसर्ग होण्याची दाट शक्यात निर्माण होते.

अतिरिक्त खबरदारीसाठी, कोंबडी किंवा कोंबडीशी संबंधित इतर उत्पादने हाताळताना चेहऱ्यावर मास्क आणि ग्लोव्हज वापरा. तसेच हे पदार्थ घरातील इतर पदार्थांपासून वेगळे ठेवा.

पोल्ट्रीसंबंधित पदार्थ 70 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमानात शिजवले गेले पाहिजेत, जेणेकरून मांस कच्चे आणि लालसर राहणार नाही. जरी एखाद्या कोंबडीस संसर्ग झाला असेल तर, व्यवस्थित शिजवल्यामुळे H5N1 विषाणू मरेल.