
एका भक्ताने महाराजांना प्रश्न विचारला. रस्त्यावर मिळालेले पैसे आपल्याजवळ ठेवायचे का?. त्यावर प्रेमानंद महाराजांनी उत्तर दिलं की, रस्त्यावर मिळालेले पैसे आपल्याजवळ ठेऊ नयेत. कारण हा पैसा दुसऱ्याचा असतो. हे पैसे उचलून आपल्याजवळ ठेवणं योग्य नाही.

प्रेमानंद महाराज म्हणाले की, रस्त्यावर पडलेले पैसे मिळणं हा शुभ संकेत मानला जातो. पण ते पैसे उचलून आपल्याजवळ ठेऊ नयेत. कारण असं करणं एखाद्याच्या पैशाची चोरी करण्यासारखं आहे.

जर, तुम्हाला रस्त्यावर पैसे मिळाले तर ते उचलून तुम्ही स्वत:जवळ ठेवता किंवा आपल्या गरजांवर तो पैसा खर्च करता. पण त्यामुळे तुम्हाला पाप लागतं. म्हणून रस्त्यावर मिळालेले पैसे आपल्या गरजांवर खर्च करु नका.

प्रेमानंद महाराज म्हणाले की, जर तुम्हला रस्त्यावर पैसे मिळाले, तर ते धर्म कार्यासाठी खर्च करा किंवा मंदिरात दान करा. त्याशिवाय रस्त्यावर मिळालेल्या पैशाने गोमातेची सेवा करावी. त्यामुळे पुण्य प्राप्ती होते.

रस्त्यावर मिळालेले पैसे तुम्ही गोमातेची सेवा किंवा अन्य जीव-जंतुच्या सेवेत खर्च केले, तर याने दोघांना फळ मिळेल. ज्याचा पैसा हरवला आहे त्याला सुद्धा फळ मिळेल आणि ज्याने तो पैसा योग्य ठिकाणी खर्च केला, त्याला सुद्धा.