
13.61 किलोमीटर लांब नव्याने बांधण्यात आलेल्या मेट्रो नेटवर्कचे उद्घाटन केले जाणार आहे. या मार्गांवर मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे.

पंतप्रधान मोदी जेसोर रोड येथून नोआपारा–जय हिंद विमानबंदर मेट्रो सेवेचा झेंडा दाखवून शुभारंभ करतील. ते सियालदह–एस्प्लानेड मेट्रो सेवा आणि बेलीघाटा–हेमंत मुखोपाध्याय मेट्रो सेवेचाही शुभारंभ करतील.

पंतप्रधान या मेट्रो मार्गांसह हावडा मेट्रो स्टेशनवर नव्याने बांधण्यात आलेल्या सबवेचेही उद्घाटन करतील. नोआपारा–जय हिंद विमानबंदर मेट्रो सेवा विमानतळापर्यंतचा प्रवेश सुलभ आणि जलद करणार आहे.

सियालदह–एस्प्लानेड मेट्रोमुळे दोन्ही ठिकाणांमधील प्रवासाचा वेळ सुमारे 40 मिनिटांवरून केवळ 11 मिनिटांवर येणार आहे. बेलीघाटा–हेमंत मुखोपाध्याय मेट्रो मार्ग माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

हे मेट्रो मार्ग कोलकात्याच्या काही अतिव्यस्त भागांना जोडतील, प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करतील आणि बहुपर्यायी परिवहन व्यवस्थेला बळकटी देतील, ज्याचा लाखो दैनिक प्रवाशांना फायदा होणार आहे.