
क्रिकेटर्सच्या खाजगी जीवनाबद्दल अनेकांना माहित करुन घेण्याची उत्सुकता असते. विशेषत: त्यांच्या लव्ह लाइफबद्दल. आता सोशल मीडियामुळे ते शक्यही होत आहे. भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या बाबतीत असंत काहीतरी आहे. पृथ्वी शॉ आणि मॉडेल, टीव्ही स्टार प्राची सिंग यांच्या रिलेशनशिपची चर्चा आहे. अनेक जोडप्यांप्रमाणेच या दोघांनीही अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाहीये, मात्र इन्स्टाग्रामवर हे दोघंही एकमेकांच्या फोटोंवर कमेंट्स करत असतात. यावेळी पृथ्वी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटलकडून खेळत आहेत. रविवारी जेव्हा ते सामनावीर, तेव्हा पृथ्वी शॉ प्राचीच्या इन्स्टा स्टोरीमध्ये हार्ट इमोजीसह दिसला.

ही प्राची सिंह कोण आहे? प्राचीचा जन्म 22 जुलै 1995 रोजी मुंबई येथे झाला होता. प्राची ही छोट्या पडद्याची मॉडेल आणि अभिनेत्री आहे. 2019 मध्ये उडान सीरियलमधील वंशिका शर्माच्या भूमिकेत ती प्रथम कलर्स टीव्हीवर दिसली होती. तेव्हापासून तिच्या कामाला गती मिळाली. सध्या प्राची सोनी टीव्हीवरील शो इंडियावाली माँमध्ये काम करतेय.

अभिनयाबरोबरच प्राचीला डान्सची आवड आहे. ती उत्तम बॅली डान्स करते. प्राचीच्या इन्स्टाग्राममध्ये तिचे डान्स व्हिडीओ पाहायला मिळतील. इन्स्टाग्रामवर तिचा चांगला फॅन फॉलोईंग आहे. 19.8 हजारांहुन अधिक लोक तिला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात.

नृत्य आणि अभिनयाशिवाय फॅशनमध्येही प्राचीला आवड आहे. तिच्या इन्स्टाग्राम पोस्ट बघून हे याची जाणीव होते. की तिला फॅशन वर्ल्डमध्ये सुद्धा खूप रस आहे. ती इन्स्टाग्रामवर प्रचंड अॅक्टिव असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करते.

आयपीएल -2020 सीझनपासून प्राची आणि पृथ्वीच्या डेटिंगबाबत चर्चा सुरू झाली होती. तेव्हापासून हे दोघंही सोशल मीडियावर एकमेकांचं कौतुक करताना दिसतात.