
'सेक्शन 375' या चित्रपटात भूमिका साकारलेली अभिनेत्री मीरा चोप्रा लवकरच आयुष्याच्या एका नव्या प्रवासाची सुरुवात करणार आहे. येत्या 11 आणि 12 मार्च रोजी जयपूरमध्ये ती लग्नबंधनात अडकणार आहे. या लग्नसोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. मात्र मीराचा होणारा पती कोण आहे, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

मीरा चोप्रा ही बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राची चुलत बहीण आहे. तिने 'सफेद' या चित्रपटातही भूमिका साकारली आहे. यामध्ये तिने बरखा बिष्ट, छाया कदम आणि जमील खान यांच्यासोबत काम केलंय. हा चित्रपट 29 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये आणि त्यानंतर झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला.

काही दिवसांपूर्वीच प्रियांकाची दुसरी चुलत बहीण आणि अभिनेत्री परिणिती चोप्राने लग्न केलं. आता चोप्रा कुटुंबात पुन्हा एकदा सनई-चौघडे वाजणार आहेत. मीराचा होणारा पती बिझनेसमन असल्याचंही म्हटलं जात आहे.

मीराने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली. तिने तमिळ, तेलुगू या दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अधिक काम केलंय. मध्यंतरीच्या काळात मीराने कामातून ब्रेक घेतला होता. त्यानंतर 'सफेद' चित्रपटातून तिने कमबॅक केलं.

एका मुलाखतीत मीराने सांगितलं की तिचं प्रियांका आणि परिणिती चोप्रासोबत बहिणींसारखं खास नातं नाहीये. बॉलिवूड इंडस्ट्रीत काम करताना त्यांच्याकडून विशेष काही मदत मिळालं नसल्याचाही खुलासा तिने केला.