
बाॅलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा पती आणि गायक निक जोनस हा गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे. जोनस ब्रदर्स हे सध्या त्यांच्या कॉन्सर्ट टूरवर आहेत.

विविध शहरांमध्ये जोनस ब्रदर्सने त्यांच्या शोचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे या कॉन्सर्टला प्रेक्षकांची तूफान गर्दी ही बघायला मिळत आहे. मात्र, यादरम्यान काही धक्कादायक प्रकार घडताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वीच न्यूयॉर्कच्या यांकी स्टेडियममध्ये कॉन्सर्ट सुरू असतानाच एका महिलेने तिची ब्रा थेट निक जोनस याच्या अंगावर फेकली होती. ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.

आता जोनस ब्रदर्सच्या कॉन्सर्टवेळी एका चाहत्याने चक्क निक जोनस याच्या अंगावर रिस्टबॅड हे निक जोनस याच्या अंगावर फेकला. धक्कादायक म्हणजे तो निक जोनस याच्या छातीला जाऊन लागला.

या प्रकारानंतर निक जोनस हा चांगलाच भडकलेला दिसला. या चाहत्याला चेतावणी देताना देखील निक जोनस हा दिसला आहे. या सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद देखील झालाय.