प्राध्यापकाचा अनोखा प्रयोग, छतावर फुलविली ‘विषमुक्त’ पालेभाज्यांची बाग!

आपण बाजारातून पालेभाज्या आणतो. पण त्या भाज्या किती विषमुक्त आहेत की नाही, याबद्दल आपल्याला काहीही माहिती नसतं... पण एका प्राध्यापकाने अनोख प्रयोग करत घराच्या गच्चीवरच दररोज लागणारा ताजा व सेंद्रिय भाजीपाला पिकवला आहे

| Updated on: Feb 02, 2026 | 3:15 PM
1 / 5
अंबाजोगाई शहरातील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. राम बडे यांनी आपल्या घराच्या छतावर शेतीचा यशस्वी प्रयोग राबवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. शेतीसाठी त्यांचा प्रयोग एक उत्तम उदाहरण ठरत आाहे.

अंबाजोगाई शहरातील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. राम बडे यांनी आपल्या घराच्या छतावर शेतीचा यशस्वी प्रयोग राबवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. शेतीसाठी त्यांचा प्रयोग एक उत्तम उदाहरण ठरत आाहे.

2 / 5

शेतकरी कुटुंबातील वारसा लाभलेल्या डॉ. बडे यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि जिद्दीच्या जोरावर घराच्या गच्चीवरच दररोज लागणारा ताजा व सेंद्रिय भाजीपाला पिकवला आहे. यात फळभाज्या, पालेभाज्या व कंदमुळे यांचा समावेश आहे.

3 / 5

डॉ. बडे यांनी 2023 मध्ये आपल्या घराचे बांधकाम पूर्ण करतानाच 'टेरेस गार्डन'चे नियोजन केले होते. छताला ओलावा किंवा गळती लागू नये, यासाठी त्यांनी विशेष काळजी घेतली. पाण्याच्या नियोजनासाठी त्यांनी छतावरील टाकीला वेगळा व्हॉल्व जोडून पॉइंट काढत त्याला पाईप जोडून फवाऱ्या सारखे पाणी या बागेला देतात यामुळे पाण्याचा अपव्यय टाळून झाडांना आवश्यक तेवढेच पाणी मिळत आहे.

4 / 5

सध्या या बागेतून डॉ. बडे यांच्या कुटुंबाला रोजच्या आहारात लागणाऱ्या बहुतांश भाज्या उपलब्ध होत आहेत. यात मुख्यत्वे वांगी, टोमॅटो, हिरवी मिरची, काकडी, कद्दू या फळभाज्या आहेत.

5 / 5

तर पालक, कोथिंबीर, मेथी या पालेभाज्या व इतर मुळा, गाजर, बीट, पत्ताकोबी आणि फुलकोबी यांचा समावेश आहे. या पालेभाज्यामुळे त्यांची पैश्याची बचत होत असून त्यांना विषमुक्त भाजीपाला खायला मिळत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us