ओटीटीवर येतोय ‘धुरंधर 2’चाही बाप! तब्बल 6500 कोटींची कमाई केलेला ब्लॉकबस्टर

बॉक्स ऑफिसवर हजारो कोटी रुपयांची कमाई करणारा या वर्षातील टॉप रेटेड चित्रपट अखेर ओटीटीवर स्ट्रीम होण्यासाठी सज्ज झाला आहे. तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतील.

| Updated on: Jul 02, 2026 | 2:56 PM
1 / 5
जवळपास तीन महिन्यांपूर्वी जगभरातील थिएटर्समध्ये धुमाकूळ घातलेला टॉप-रेटेड चित्रपट अखेर ऑनलाइन स्ट्रीम होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाला भारतात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जात आहे. हा चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, तेव्हा बॉक्स ऑफिसवर त्याने कमाईच त्सुनामीच आणली होती.

2 / 5
2026 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत याचा समावेश आहे. या चित्रपटाने बजेटच्या तीन पटीने अधिक कमाई केली होती. भारतासह जगभरातील प्रेक्षकांकडून त्याला दमदार प्रतिसाद मिळाला होता आणि त्याची रेटिंगसुद्धा तगडी आहे. या चित्रपटाचं नाव आहे 'प्रोजेक्ट हेल मेरी'.

3 / 5
रयान गोसलिंगची मुख्य भूमिका असलेला हा साय-फाय थ्रिलर चित्रपट 20 मार्च रोजी परदेशात प्रदर्शित झाला होता. मात्र भारतात त्याच्या सहा दिवसांनी तो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामागचं कारण रणवीर सिंहचा 'धुरंधर 2' हा चित्रपट होता. आदित्य धर दिग्दर्शित हा बॉलिवूड चित्रपट तुफान कमाई करत असतानाही 'प्रोजेक्ट हेल मेरी'ने 26 जून रोजी येऊन धमाका केला.

4 / 5
'प्रोजेक्ट हेल मेरी'ने भारतात जवळपास 90 कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलं होतं. तर परदेशात या चित्रपटाने हजारो कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. बॉक्स ऑफिस मोजोने दिलेल्या माहितीनुसार, रयान गोसलिंगच्या या चित्रपटाने जगभरात तब्बल 683.5 दशलक्ष डॉलर म्हणजेच 6500 कोटी रुपयांची कमाई केली होती.

5 / 5
या चित्रपटाची कथा एका माध्यमिक शाळेतील शिक्षकाभोवती फिरते. एके दिवशी हा शिक्षक जागा होतो तेव्हा स्वत:ला तो एका अंतराळयानात पाहतो. तो तिथे कसा आणि केव्हा पोहोचला, याची त्याला काहीच आठवण नसते. रयाननेच त्या शिक्षकाची भूमिका साकारली असून या चित्रपटाला IMDb वर दहापैकी 8.2 अशी उत्तम रेटिंग मिळाली आहे. हा चित्रपट 3 जुलै रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होणार आहे.

Follow Us