1 तास 52 मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट; क्लायमॅक्ससमोर ‘दृश्यम’सुद्धा पडेल फिका
सध्या ओटीटीवर मल्याळम चित्रपटांची क्रेझ वाढताना दिसत आहे. या चित्रपटाची पटकथा, कलाकारांचं अभिनय आणि कथेतील ट्विस्ट दमदार असतात. असाच एक चित्रपट सध्या ओटीटीवर चांगलाच ट्रेंड होतोय.

हा एक असा क्राइम, थ्रिलर आणि सस्पेन्सचा भरणा असलेला चित्रपट आहे, ज्याला बघायला सुरुवात केली तर संपेपर्यंत तुम्ही खुर्चीला खिळून राहाल. हा एक असा मल्याळम चित्रपट आहे, ज्याचा क्लायमॅक्स पाहून तुम्ही 'दृश्यम'लाही विसराल.

या चित्रपटाचं नाव आहे 'इरट्टा'. यामध्ये जॉजू जॉर्ज मुख्य भूमिकेत आहे, तर रोहित कृष्णनने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत यात असे ट्विस्ट आहेत की तुम्ही थक्क व्हाल. यामध्ये जुळ्या भावंडांची कथा दाखवण्यात आली.

जॉजूने यात जुळ्या भावंडांची भूमिका साकारली आहे. यामध्ये अंजली, आर्या सलीम आणि श्रीकांत मुरली यांसारख्या कलाकारांच्याही मुख्य भूमिका आहेत. संपूर्ण कथेसोबतच याचा क्लायमॅक्स विशेष चर्चेत आहे. शेवटपर्यंत काय घडेल, याचा अंदाज तुम्ही लावू शकत नाही.

हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. जर तुम्हाला कथेत सस्पेन्स आणि थ्रिल आवडत असेल तर हा चित्रपट आवर्जून पहा. आयएमडीबीवर या चित्रपटाला दहापैकी 7.7 रेटिंग मिळाली आहे.

1 तास 52 मिनिटांचा हा चित्रपट असून याचा बजेट फक्त पाच कोटी रुपये इतका आहे. जर तुमच्याकडे नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन नसेल तर तुम्ही युट्यूबवरही हा चित्रपट मोफत पाहू शकता.